पक्षांतर गट बाजी मुळे हवेलीतील स्थानिक पुढऱ्यांची गोची..!
लोकपसंद न्यूज : विशेष प्रतिनिधी, हवेली
हवेली : सध्या लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून जे ते स्थानिक नेते पुढारी आपला आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी जे राजकीय षडयंत्र महाराष्ट्रात झाले, त्यामुळे या लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान हवेली तील स्थानिक राजकीय पुढऱ्यांची गोची झाल्याचे दिसत आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे दोन मोठे नेते हे पुणे जिल्ह्यातील असून त्या मुळे हवेली तालुक्यातील नेत्यांना नक्की प्रचार कोणाचा करावा ? हेच समजेना झाले आहे.
जे नेते सकाळी “साहेबांसोबत ” तेच नेते रात्री “दादांसोबत”
पक्षांतर गट बाजी मुळे एकाच पक्षाचे दोन गट सध्या महाराष्ट्रात दिसत आहेत, त्यामुळे जे स्थानिक पुढारी आहेत त्यांची प्रचार करताना गोची होत आहे, “इकडे आड तर तिकडे विहीर” अशी परिस्थिती झालेली दिसत आहे, साहेबांसोबत गेल तर दादाची “दादागिरी” आणि दादा सोबत जावं तर आमदारांची नाराजी असे चित्र सध्या हवेलीतील पुढऱ्यांमध्ये तयार झालेले दिसत आहे.