मतदारांनो सावधान..! तीर्थयात्रा, देवदर्शन घडवून विकास होत नाही.. सावधान..!
लोकपसंद न्यूज : हनुमंत सुरवसे, पुणे
पुणे ता. हवेली : संपूर्ण महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असून, या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते मंडळींनी विविध प्रकारे आपले आपले रंग दाखवले, परंतू अशा स्वप्नरंगी रंगाला मतदारांनो बळी पडू नका, सावध व्हा, जागरूक व्हा आणि विचारपूर्वक विकासाधीन होऊन मतदान करा.
गेल्या काही दिवसापूर्वी एका नेत्याने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तीर्थ यात्रा, देवदर्शन करून स्वतःच्या स्वार्था पोटी मतदारांना भावनिक केले आहे.
विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आल्यानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेणं, यात्रा काढणं, देवांच्या आरत्या करणे, काकडा आरतीला जाणे, या गोष्टी करून मतदारांना भावनिक करून देवाच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजून स्वार्थ साधून घेणे असे चित्र या सर्व गोष्टी मधून दिसत आहे, त्यामुळे मतदारांनो अशा गोष्टींना बळी पडू नका.
आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल ? या आधी विकास कुणी केला ? देवदर्शन, तीर्थ यात्रा काढून विकास होत नाही हे मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे, ‘विकासाला गती म्हणजेच आपली प्रगती ‘ हे समजले तरच आपला आणि आपल्या उज्वल भविष्याचा विकास झाल्यासारखे आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते अशी विविध प्रकरची विकास कामे करणारा नेता निवडा, भुलथापांना बळी पडू नका, आपला नेता ‘कार्यसम्राट’ निवडा आणि त्यालाच मतदान करा.. सावधान व्हा, मतदारांनो जागरूक व्हा..!