अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली ; प्रसार माध्यमांचा शिवी देऊन उल्लेख
लोकपसंद न्यूज : विशेष प्रतिनिधी, हवेली
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आल्याचे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे.
असेच एक विधान शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन केले होते त्या प्रचार सभे च्या दरम्यान अजित पवारांनी प्रसार माध्यमांना शिवी देऊन वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे, या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्र राज्यात अजित पवार यांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणूकी प्रचार रण धुमाळी जोरात झाली असून, या मध्ये दमबाजी, दादागिरी, शिवीगाळ, हे असे चित्र पाहायला मिळाले, अजित पवारांचा आमदार अशोक पवार यांना दिलेला दम तसेच निलेश लंके यांनाही तसाच दम दिला असून, तिकडे इंदापूर मध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही एका मतदाराला शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले, बीड मध्ये धनंजय मुंडे यांनी ही सरपंचाला दम दिल्याने चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले, हे महायुती चे नेते सध्या दमबाजी, दादागिरी च राजकारण करताना दिसत आहे, त्यामुळे जनताच आता यांना काय उत्तर देते ते येणारा भविष्यकाळ च सांगू शकेल.