सपोनि रवींद्र भोरेंची तत्परता ; ट्रॅव्हल्स मालकाचा प्रामाणिक पणा
लोकपसंद न्यूज : रघुनाथ थोरात, सातारा
उंब्रज, ता. कराड : कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे यांची तत्परता अनं ट्रॅव्हल्स मालकाच्या प्रामाणिकतेमुळे चार तोळे सोने असलेली बँक संबंधित महिलेला परत मिळाली आहे. याबाबत सपोनि रविंद्र भोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा शिवाजी चव्हाण रा राहूडे या कराड ते ठाणे असा प्रवास करीत असताना त्यांची बॅग ट्रव्हॅल्समध्ये विसरली. सदर बाबत त्यानी उंब्रज पोलीस ठाणे येथे येऊन माझी पर्स खाजगी बसमध्ये विसरली आहे व त्यामध्ये माझे ४ तोळे सोन्याचे दागिने आहेत.परंतु,मला त्या गाडीचा नंबर व इतर काहीही माहिती नाही असे सांगितले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API रविंद्र भोरे यांनी
पोलीस हवालदार संजय धुमाळ व ट्राफिक कॉन्स्टेबल हेमंत पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल थोरात याना सदर बाबत सूचना दिल्या असता त्यानी आजूबाजूला विचारपूस करून तसेच तासवडे टोलनाका येथे चौकशी करुन गाडी नंबर वरुन मोबाईल नंबर शोधला.त्यावरून गाडी मालकाला संपर्क करुन विचारपुस केली असता गाडीमध्ये सदर बॅग व त्यामधील साहित्य असलेबाबत सांगितले.
स्वत: ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्सचे गाडी मालक यांनी प्रामाणिकपणा दाखवत उंब्रज पोलीस ठाणे येथे येऊन विसरलेली बॅग संबंधितांच्या सुपूर्द केली. सपोनी रवींद्र भोरे यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक परिसरातून होत आहे.