पुणेमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“दादा क्या हुआ तुम्हारा वादा” यशवंत कारखान्याबाबतच्या वक्तव्याची आठवण..!

लोकपसंद न्यूज : हनुमंत सुरवसे, हवेली

हवेली : शिरूर हवेली लोकसभा मतदारसंघात निवडणूकी च्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूने जोरदार झाले, महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ पूर्व हवेलीत शरद पवार यांची उरुळी कांचन येथे सभा झाली तर महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची उरुळी कांचन, कदमवाकवस्ती येथे सभा झाली त्यामुळे वातावरण ढवळून निघाले असून महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत केलेल्या कामाच्या तसेच संसदेत उपस्थित केले महागाई बेरोजगारी कांदा सोयाबीन हे मुद्दे संसदेत उपस्थित करून सत्ताधारी पक्षांना सळूकीपळू करुन सोडलं होतं, हेच मुद्दे उपस्थित करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

 पूर्व हवेलीत मात्र चित्र काहीसे वेगळेच आहे मतदारांमध्ये मतदानाबाबत संभ्रम अवस्था असून हवेलीतील पुढार्‍यांची मात्र राजकीय घडामोडी मुळे पक्ष फुटीमुळे गोची झाली असून “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” अशी अवस्था झाली असल्याचे चित्र आहे.

पूर्व हवेलीत मात्र यशवंत सहकारी साखर कारखाना गेली बारा वर्षापासून बंद आहे अनेक निवडणूका झाल्या परंतु फक्त आश्वासनच मिळाले.

अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळी हवेली तालुक्याच्या वतीने अजित पवारांचा कदमवाकवस्ती येथील गुलमोहर कार्यालयात जंगी सत्कार करण्यात आला होता त्यावेळी अजित पवार यांनी यशवंत बाबात जाहिर घोषणाच केली होती की, ब्रह्मदेव जरी आला तरी यशवंत चालू होऊ शकत नाही अजित पवार कारखाना बंद पडल्यापासून महाविकास आघाडी तसेच महायुती सरकार मिळून जवळपास सात ते आठ वर्षे पालकमंत्री तसेच वित्त मंत्री म्हणून कार्यरत आहेत सहकार खाते, पीडीसीसी बँक देखील त्यांच्याच ताब्यात आहेत तरी देखील कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक पॅकेज पासून वंचितच राहिला आताच उरुळी कांचन तसेच कदमवाकवस्ती येथील महायुतीच्या सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्या मी कारखाना चालू करण्यासाठी मदत करतो त्यामुळे अजित पवारांच्या मागील विधानाचीच चर्चा सध्या पूर्व हवेलीत सुरु असून “क्या हुआ तेरा वादा” या हिंदी गीताची आठवण सभासदांना होत असून अजित पवार शब्दाचे पक्के आहेत पण यशवंत बाबत मात्र शब्द आता तरी पाळतील का ?  याचीच सभासदांमध्ये चर्चा असून नेते एकीकडे आणि सर्वसामान्य जनतेचा कौल कुणाकडे राहील ? हे मात्र मतदान झाल्यावरच ४ जूनला मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.

एकंदरीतच शिरुर लोकसभेची निवडणूक पूर्व हवेलीत शेवटच्या टप्प्यात मात्र यशवंत भोवतीच फिरत असल्याची सध्या चित्र आहे. निवडणूक झाल्यावर आता तरी कारखाना चालू करण्याच्या दिलेल्या शब्दावर आता अजित पवार ठाम राहणार का ? असा प्रश्न पूर्व हवेलीतील शेतकरी व सभासद तसेच सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!