युवराज काळभोर जन संपर्क कार्यालय (लोणी काळभोर) येथे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन..!
लोकपसंद न्यूज : प्रतिनिधी हनुमंत सुरवसे, हवेली पुणे
लोणी काळभोर, (पुणे) : केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांसाठी “आधार” चा उपयोग होतो. त्यासाठी अद्ययावत केलेले ‘आधार कार्ड’ च स्वीकारले जाते. म्हणून प्रत्येकाने आधार अपडेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका कार्याध्यक्ष युवराज काळभोर यांनी केले आहे.
हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष (अजित पवार) वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या संकल्पनेतून मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील युवराज काळभोर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य अशा मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन सोमवारी (ता. ०९) पासून ते शुक्रवार (दि. १३) असे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दिलीप वाल्हेकर बोलत होते.
यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, माजी उपसरपंच ललिता काळभोर, राजु आबा काळभोर, ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, सतीश काळभोर, सिद्धेश्वर काळभोर, रमेश काळभोर, सचिन काळभोर, संदीप कुंजीर, अशोक कुंजीर, सुरेश काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, किरण वाळके, स्वप्नील काळभोर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या शिबिरात आज पर्यंत जवळ जवळ ७५० ते ८०० नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे, नवीन आधारकार्ड काढणे, चुक दुरुस्ती करणे, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, आधारकार्ड अपडेट करणे, नावात बदल करणे व आधारकार्ड पत्ता बदलणे या अशा सुविधा देण्यात येत आहेत.
आधारकार्ड दुरुस्ती अथवा नवीन काढण्यासाठी नागरिकांना खूप अडचणी येत आहे. त्याच अनुषंगाने आता जनतेसाठी आधारकार्ड शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा. व आधारकार्डच्या संदर्भातील अडचणी सोडवाव्यात.
दरम्यान, मोफत आधार कार्ड अपडेट शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. युवराज काळभोर हे मागील एक वर्षांपासून काही ना काही निमित्ताने वर्षभर सेवाभावी उपक्रम राबवीत आहेत, त्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होताना पाहायला मिळत आहे, तसेच त्यांनी स्वखर्चाने मुख्यमंत्री लाकडी बहिण योजेनेचे फॉर्म भरून देण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे.