पुणे सोलापूर महामार्गांवरील कवडीपाट टोल नाक्या जवळील गुलमोहर लॉन्स येथील होर्डिंग कोसळले..!
लोकपसंद न्यूज : प्रतिनिधी दिगंबर जोगदंड, हवेली
पुणे, {हवेली} : पुणे सोलापूर महामार्गांवरील कवडीपाट टोल नाक्या जवळील गुलमोहर लॉन्स येथील होर्डिंग पावसाच्या वाऱ्यामुळे कोसळले असून या दुर्घटने मध्ये कोणत्याही प्रकरची जीवितहानी झाली नसून, मात्र दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटने मध्ये गाड्यांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.
या दुर्घटने मध्ये पोलीस पंचनामा करत असून, होर्डिंग चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल होणार का..? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हवेली तालुक्यामधील अनाधिकृत होर्डिंग चा सुळसुळाट..!
हवेली तालुक्यामधील कवडीपाट टोल नाका ते उरुळी कांचन परिसरामध्ये अनाधिकृत धोकेदायक होर्डिंग्ज चा सुळसुळाट पाहायला मिळत आहे तरी देखील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या सर्व गोष्टींवर कारवाई का करत नाही ? अशी चर्चा सध्या हवेली तालुक्यामध्ये रंगताना दिसत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून या अनधिकृत होर्डिंग संदर्भात कारवाई नोटीस प्रकाशित करून सुद्धा ह्या होर्डिंग धारकांवर नक्की कारवाई का होत नाही ? असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे, नक्की या सर्व गोष्टींना कोण खत-पाणी घालत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा वादळ सुरू आहे.
लोणी कॉर्नर, थेऊर फाटा अत्यंत धोकादायक परिस्थितीत..!
पुणे सोलापूर महामार्गांवर लोणी काळभोर गावा मध्ये जात असणाऱ्या दोन्ही बाजूस असणारे होर्डिंग्ज हे अत्यंत धोकादायक परिस्थितीत असून लोणी कॉर्नर व थेऊर फाटा हे रस्ते रहदारीचे असून या ठिकाणीचे होल्डिंग धोकादायक परिस्थितीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, भविष्यातील होणारा धोका टाळण्यासाठी हे होर्डिंग हटवणे गरजेचे आहे.