दादांना दम बाजी ची भाषा शोभत नाही ; इशाऱ्यानंतर पवारांचा आमदार भिडला..!
लोकपसंद न्यूज : हनुमंत सुरवसे, हवेली
हवेली : सध्या लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून जे ते स्थानिक नेते पुढारी आपला आपला उमेदवार निवडून येण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे, की अरे पट्ठया तू आमदार च कसा होतो तेच बघतो, कारखान्याची वाट लावली, तुला साहेबानी दिलय मंत्री पदाच गाजर, अरे पट्ठया तू मंत्री काय आमदारच कसा होतो तेच बघतो, याची खरी अवकात काय आहे असा अजित पवार यांनी शरद पवार यांचे आमदार अशोक पवार यांना दिला.
या विषयी शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी बोलताना सांगितले की, अजित दादा फार मोठे नेते असून मी एक छोटा कार्यकर्ता आहे, आणि मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा, दुधाचे दर चांगले वाढवून द्यावे, मी फार छोटा आणि इमानदार कार्यकर्ता आहे, माझी अवकात काढून काय उपयोग होणार आहे ?
मी शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे मी तुमच्या सोबत आलो नाही म्हणून तुम्ही या थराला जाण योग्य आहे का ?
राहिला विषय कारखान्याचा तर माझ्या समोरासमोर जनता दरबार लावून बसा त्याच उत्तर मी तुम्हाला देतो, मी कधीच मंत्री पदाची अपेक्षा केली नाही मी एक सर्व सामान्य माणूस आहे माझं काम हे इमानदार पद्धतीने असून मंत्री पद तर सोडा मला आमदारकीच तिकीट जरी नाही दिलं तरी मी शरद पवार साहेबांसोबत च असणार आणि मला आमदार करायच का नाही हे जनता ठरवेल असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.