“आधे इधर आधे उधर बचे हुए मेरे पीछे” पूर्व हवेलीतील पुढऱ्यांची परिस्थिती..!
लोकपसंद न्यूज : विशेष प्रतिनिधी, हवेली
हवेली : संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे पुण्यातील लोकसभा मतदार संघाकडे लक्ष लागून आहे. जो तो नेता, पुढारी आपला स्थानिक उमेदवार निवडून येण्यासाठी पुर्णपणे ताकद लावताना दिसत आहे. पुणे जिल्हा हा महाराष्ट्र राज्याचा निवडणूकीचा केंद्र बिंदू मानला जाणारा मतदार संघ असून हा “दादांचा” आणि “साहेबांचा” बालेकिल्ला आहे, त्यामुळे स्थानिक पुढारी हे “आधे इधर आधे उधर बचे हुए मेरे पीछे” अशा परिस्थितीत असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाल्याने सर्व सामान्य जनते ला हेच कळेना नक्की कोण कोणाचा प्रचार करत आहे ? आणि कोणावर विश्वास ठेवून आपण मतदान करावे ? त्यामुळे मतदार हे पूर्णपणे संभ्रमात असून नक्की विश्वास ठेवावा कुणावर ? हेच त्यांना कळेना, पुढारी, नेते मंडळी हे स्वतःच्या राजकीय फायद्यापोटी स्वार्थी पणा करताना दिसत आहे.
मतदारांना विश्वासात कोण घेणार..?
पूर्व हवेली तील स्थानिक गाव पातळीवरील पुढऱ्यांची या पक्ष फोडाफोडी च्या राजकारणा मुळे गोची झाल्याचेही चित्र दिसत आहे, मतदारांना काय शब्द द्यावा ? हेच त्यांना कळेना त्यामुळे मतदारांना विश्वासात घेऊन ठाम पणाने मतदान मागतानाही काही पुढारी मंडळींना भीती निर्माण झाल्याचे दिसत आहे.