सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सत्कार
उरुळी कांचन : शनिवार, दि. २५ मे, २०२४ रोजी बायफ रोड कावळे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथे भगवान बुद्ध पौर्णिमेनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, भीमज्योत प्रतिष्ठान, जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘काळजावर कोरलयं नाव आमच्या भीमा कोरेगाव’ फेम सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे प्रस्तुत तुफानातले दिवे बुद्ध व भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा पंचशील आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ हे पुस्तक देऊन संयुक्त जयंती महोत्सवाचे प्रमुख निलेश शेलार, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उरुळी कांचन शहर अध्यक्ष देविदास बडेकर, उपाध्यक्ष संदीप बडेकर, धम्मप्रचारक सचिन खंडागळे, भीमसैनिक स्वप्निल कांबळे, संघ नायक न्यूज संपादक सदाशिव कांबळे यांनी सत्कार केला.