लोणी काळभोर : लोणी काळभोर माळी मळा येथे वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमा निमित्त विविध क्षेत्रांमधील नागरिकांनी सहभाग घेऊन, तपासणी करून त्या ठिकाणी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या तपासणी शिबिरा मध्ये शुगर, ब्लड प्रेशर, वजन, उंची व संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी मराठी चित्रपटातील विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनीही सदिच्छा भेट देऊन त्यांनी स्वतः आरोग्य तपासणी केली व युवराज काळभोर यांना पुढील वाटचालीस व त्यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच या आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन शिवम हॉस्पिटलचे मालक व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ वेताळ, सुहास गाडगे, सिस्टर पल्लवी पंडित, फार्मसीस शुभम झेंडे यांनी केले होते, तसेच या वेळी लोणी काळभोर ग्रा.पं.मा. उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) हवेली तालुका उपाध्यक्ष सतीश काळभोर, युवा उद्योजक राजेंद्र काळभोर, हर्षल काळभोर, राहुल काळभोर, संदीप कुंजीर, अतुल शिंदे, महेश कराड, भगवान काळभोर पत्रकार दिगंबर जोगदंड, हनुमंत सुरवसे या वेळी उपस्थित होते.