हवेलीतील शिवसैनिक निष्ठेने अशोक पवारांचे काम करेल – स्वप्नील कुंजीर पाटील
लोकपसंद न्यूज: विशेष प्रतिनिधी, पुणे
पुणे, ता. हवेली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर हवेली विधानसभा संघटक स्वप्नील कुंजीर पाटील यांच्यावतीने शिवसैनिकांसाठी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अशोक पवार उपस्थित होते, याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना आमदार पवार यांनी मी निष्ठेने शरद पवार साहेब व महाविकास आघाडी सोबत राहिलो असल्याने आपण मला साथ द्या असे भावनिक आव्हान केले.
यावेळी शिवसेना हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी महिला आघाडी तालुका प्रमुख छायाताई महाडिक, संघटिका उर्मिलाताई भुजबळ, हवेली तालुका उप प्रमुख हनुमंत सुरवसे, तालुका संघटक गणेश धुमाळ, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोंडवे, उपाध्यक्ष तानाजी जाधव, संघटक विष्णु नरके, शिवसेना विभागप्रमुख अजय मोरे, संतोष खेंगरे, शाहजी बनकर, उप विभागप्रमुख शिवाजी ढवळे, किरण थेऊरकर युवासेना हवेली सरचिटणीस हेमंत कोळपे, सागर कदम युवासेना विभागप्रमुख चंद्रकांत कुंजीर, उप शाखा प्रमुख संतोष कुंजीर, काकासाहेब क्षीरसागर, दत्ताभाऊ अडसुळे, अभिराम काळभोर, गणेश काळभोर, उमेश ढमाले, पृथ्वीराज कुंजीर, भाऊसाहेब महाडिक, शरद कोलते सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकानी आमदार अशोक पवार यांचे निष्ठेने प्रामाणिक काम करण्याचे वचन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील कुंजीर पाटील यांनी केले, तर आभार युवराज दळवी यांनी मानले.