लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांची तात्काळ बदली करा.. अन्यथा ‘आत्मदहन’ करणार..?
लोकपसंद न्यूज प्रतिनिधी, पुणे
पुणे : लोणी काळभोर च्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांची तात्काळ बदली करून नव नियुक्त तहसीलदार नेमणूक करून अप्पर तहसीलदार कार्यालय लोणी काळभोर हे दि. १४ ऑगस्ट २०२४ रोजी पूर्वी लोणी काळभोर मध्ये तात्काळ सुरु करावे अन्यथा दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या कार्यालया समोर “आत्मदहन” करणार अशी मागणी लोणी काळभोर चे हनुमंत सुरवसे यांनी केली आहे.
मे २०२१ रोजी त्यांची हवेली तालुका तहसिलदार पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२२ रोजी त्यांची वनविभाग जमिन अनाधिकृतपणे लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम ४ (१) (अ) तरतुदीनुसार उल्लंघन केल्याबददल त्यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मा. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची आहे त्या ठिकाणी हवेली तहसीलदार पदी पुन्हा रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल संशय वृत्ती निर्माण झाल्यामुळे जुन २०२१ ते आजतागायत ऑगस्ट २०२४ पर्यंतची त्यांनी केलेल्या सर्व कामांची शासकीय चौकशी, दप्तर तपासणी करण्यात यावी व शासकीय चौकशी दप्तर तपासणी पुर्ण होईपर्यंत त्यांचे सर्व शासकीय अधिकार काढून घेण्यात यावे जेणेकरुन शासकीय दप्तर तपासणीत त्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही.
तसेच अप्पर तहसिलदार लोणी काळभोर कार्यालय हे मौजे लोणी काळभोर या ठिकाणी शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी तात्काळ मंजूर करून आणले असतांना देखील अद्यापही मा. अप्पर तहसिलदार हे लोणी काळभोर मध्ये रुजू न होता सर्व कारभार पुणे याठिकाणाहूनच चालवित असल्या कारणास्तव येथील शेतकरी, सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला यांना जाण्या येण्याचा त्रास होत असून त्यामुळे शासकीय योजनेचा सर्व सामान्य महिला-पुरुष, विद्यार्थ्यांना लाभ होत नसून शासकीय योजनेपासून ते वंचित झाले आहेत.
तरी अप्पर तहसीलदार लोणी काळभोर हे कार्यालय लोणी काळभोर या ठिकाणी तात्काळ रुजू करण्यात यावे. व त्याठिकाणी नवनियुक्त अप्पर तहसिलदार नियुक्त १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत न झाल्यास मी दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे समोर आत्मदहन करणार आहे.अशी मागणी हनुमंत सुरवसे यांनी केली असून तरी त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यांच्या आत्म दहानास सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील असे लेखी पत्र त्यांनी दिले आहे.