हवेली, पुणे : पंचायत समिती हवेली चे मा. उपसभापती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुंजीरवाडी येथील आमचे ज्ञानेश्वर सावंत यांनी ग्रामीण सर्वोदय संघ संचलित प्राथमिक शाळे मधील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वखर्चाने गणवेशाचे वाटप केले व विद्यार्थ्यांना एक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली त्यामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अरुण आप्पा घुले, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत, या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.