शिरूर हवेलीतील विकास कामे बघता जनता कोणाला देणार कौल ?
लोकपसंद न्यूज : दिगंबर जोगदंड, पुणे
पुणे ता. हवेली : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. त्यातील पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी मतदारसंघ म्हणजेच शिरूर -हवेली मतदार संघ, या मतदार संघात महाविकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार तर महायुती चे उमेदवार ज्ञानेश्वर कटके या दोघांमध्ये लढत होणार असून या मध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार हे शिरूर हवेली मधून आमदार होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशी विविध प्रकारची विकासकामे शिरूर आणि हवेली अशा दोन तालुक्यांमध्ये केली.
या विकास कामांमध्ये पूर्व हवेली साठी त्यांनी जवळपास ४४ गावांसाठी अप्पर तहसीलदार कार्यालय लोणी काळभोर हे मंजूर करून आणले, आज पर्यंत गोरगरीब, सर्व सामान्य नागरिक, महिला वर्ग, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी वर्ग अशा नागरिकांना रोज तहसील कामानिमित्त पुणे शहरात जावं लागत होते त्यांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी, जिवाची होणारी धगधग या सर्व गोष्टींचा त्रास होत होता.
या सर्व बाबींचा अशोक पवार यांनी विचार करून लोणी काळभोर येथे पूर्व हवेली साठी एक स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले, तसेच पूर्व हवेलीतील रस्ते, शैक्षणिक अडचणी, तरुणांच्या नोकऱ्या, आरोग्य समस्या या सर्व बाबींचा विचार करून अनेक कामे केली त्यांची ही कामे पाहूनच महाविकास आघाडी चे नेते शरद पवार यांनी त्यांना मंत्री पद देणार असल्याचेही एका सभेत जाहीर सांगितले आहे.
महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा मध्ये जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत होते तसेच पुणे जिल्हापरिषद सदस्य देखील होते, विधानसभा निवडणूक जाहीर होताच त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली.
महायुती मध्ये अंतर्गत नाराजी सुरूच..
हवेली तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप कंद यांना डावलून आयता उमेदवार दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अजूनही अंतर्गत नाराजी असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. असो..!
शांताराम कटके यांचाही अशोक पवार यांना पाठिंबा..!
आता शिरूर हवेली तील जनतेला या वेळी मंत्रिपद हवे कि फक्त आमदारकी हे आता पाहणे महत्वाचे असणार आहे, जनता नक्की कोणाला कौल देणार हे आता २३ नोव्हेंबर लाच कळणार..!