शेतकरीपुत्र यशवंत गोसावींनी गाजवला महाराष्ट्र..!
प्रतिनिधी : दिगंबर जोगदंड, लोणी काळभोर
महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचाराचा तोफा काल थंडावल्या. राज्यभरातील ही निवडणूक अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजली. परंतु शेतकरी वर्गामध्ये सर्वाधिक चर्चा ही शेतकरीपुत्र यशवंत गोसावी यांनी शेतीसंदर्भात उभ्या केलेल्या प्रश्नांसाठी झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीयशवंत गोसावी यांनी राज्यभरात धडाक्यात सभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलं आणि ते संपूर्ण शेतकरी वर्गात प्रचंड कौतुकाचा विषय ठरले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या सभेमध्ये कांद्यावर चर्चा झाली पाहिजे या विधानामुळे त्यांना पोलिसांनी अटक देखील केली, परंतु सोशल मीडिया आणि राज्यभरातून वाढलेल्या दबावामुळे त्यांची तत्काळ सुटका करण्यात आली.
आज विरोधी पक्षात असल्याने त्यांनीं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, ही गोष्ट खरी असली तरी भविष्यात सुद्धा कायमच असा आवाज उठवला पाहिजे अशी अपेक्षा तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.