राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आढळराव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल..!
लोकपसंद न्यूज : प्रतिनिधी दिगंबर जोगदंड, हवेली
हवेली : सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आगामी लोकसभेच्या निवडणुकीची रण धुमाळी चालू असल्याचे चित्र आपण पाहत आहोत.. कोण कुठल्या पक्षात जात आहे याचा सध्या काही एक मेळ लागत नसून नक्की हे राजकीय नेते समाजकारणासाठी बेडूक उड्या मारत आहेत की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बेडूक उड्या मारत आहे.
हेच सर्वसामान्य नागरिकांना कळेना झाले आहे. सध्या शिरूर हवेलीचे माजी खासदार आढळराव पाटील यांची एक भूमिका सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष त्यांना हिंदुत्वाचे कुठलेही विचार पटत नाही ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहासच माहिती नाही अशा अजित पवारांना नव्याने इतिहास शिकवला पाहिजे अस बोलताना ते दिसत आहेत.
धरणाचे वक्तव्य कोणी केले काय केले ? हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ज्या नेत्यांना माहिती नाही जिहादी पक्ष म्हणणाऱ्या पक्षात च तुम्ही बेडूक उडी मारलीत अशाच नेत्यासोबतच तुम्ही हात मिळवनी केलीत अशी चर्चा सध्या शिरूर हवेलीच्या मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे.