“महायुती” पक्षाच्या जाहिराती बाबत मातंग समाजाची नाराजी
लहुजी वस्ताद साळवे व आण्णाभाऊ साठेंचा फोटो डावलला
हवेली,पुणे : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून, या निवडणूकी दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये “महायुती” पक्षाने निवडणूकीच्या प्रचार जाहिराती मध्ये महापुरुषांच्या फोटो मध्ये लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा फोटो डावलल्या कारणाने मातंग समाजामध्ये या “महायुती” पक्षा बाबत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
या वेळी हवेली तालुक्यातील सकल मातंग समाजाने या महायुती च्या बाबत निषेध व्यक्त केला असून या वेळी मातंग एकता आंदोलनाचे हवेली तालुका अध्यक्ष शहाजी पवार हे बोलताना म्हणाले की, “तुम्ही निवडणूकीच्या जाहिराती मध्ये जर आमच्या समाजाच्या महापुरुषांचे फोटो डावलत असाल तर तुम्ही आमच्या समाजाच्या महापुरुषांचे फोटो लोकसभेत कशावरून लावणार ? त्या मुळे आम्ही हवेली तालुका सकल मातंग समाज तसेच मातंग एकता आंदोलन यांच्या वतीने या “महायुती” पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत.”
तसेच मातंग समाजाचे हवेली तालुक्याचे युवा नेते दिगंबर जोगदंड यांनीही बोलताना सांगितले की, ” ज्या लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रातून मुंबई ला वाचवले, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता-समुद्रा पार रशिया मध्ये जाऊन सांगितला अशा आमच्या आण्णाभाऊंचा फोटो तुम्ही डावलला ? त्या मुळे सकल मातंग समाज ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आणि सकल मातंग समाजाच्या वतीने या “महायुती” पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत.”
“महायुती” पक्षाने या निवडणूकीच्या दिलेल्या जाहिरात मध्ये मातंग समाजाच्या महापुरुषांचे फोटो डावलल्या मुळे सकल मातंग समाजा मध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे, तसेच ठिकठिकाणी महायुती पक्षा बाबत निषेध व्यक्त होताना दिसत आहे.