महाराष्ट्रआरोग्यक्राईमक्रीडादेश- विदेशपुणेराजकीयशैक्षणिकसामाजिक

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघा साठी उद्या मतदान..!

लोकपसंद न्यूज : दिगंबर जोगदंड

चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत असून, राज्यात जनतेचा कौल कोणाकडे आहे हे येणाऱ्या निकालानंतर च समजणार आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, ६ मे रोजी ११ मतदारसंघात मतदान झाले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी दि.७ मे  रोजी ११ मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे.


♦लक्षवेधी लढती 

– पुणे ः महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत आहे.


– शिरूर ः महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात लढत आहे.


– मावळ ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील आणि महायुतीचे श्रीरंग बारणे अशी लढत आहे. 


– शिर्डी ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीचे सदाशिव लोखंडे यांच्यात लढत आहे.


– छत्रपती संभाजीनगर ः महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना  चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि महायुतीचे संदीपान भुमरे यांच्यात तिरंगी लढत होणार असून तीन उमेदवार आहेत.


– बीड ः भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.


– जालना ः भाजपचे पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांच्यात लढत आहे.


– जळगाव ः महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे करण पाटील आणि भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत आहे. 


– रावेर ः भाजपच्या रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे.


– नंदुरबार ः महाविकास आघाडीचे गोपाल पाडवी आणि भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यात लढत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!