गोवा पणजी येथे झालेल्या ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी केडगावचे सुवर्ण घौडदौड..!
लोकपसंद न्यूज : प्रतिनिधी नितीन गव्हाणे, दौंड
दौंड : नुकतेच गोवा पणजी येथे गव्हरमेंट युथ हॉस्टेल येथे स्केटिंग हॉकीमिरामार स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत दौंड तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल ऑफ ज्युनिअर कॉल ऑफ कॉमर्स नानगांव येथील शिक्षिका राजश्री दळवी यांची कऩ्या श्रद्धा दळवी हिने सुवर्ण पदक मिळविले.
या स्पर्धेमध्ये भारतातील एकूण १0 राज्य सामील झाले होते. त्यातच केडगाव चौफुला येथील ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी या विद्यार्थी कु. श्रद्धा सोमनाथ दळवी व द्रिषा रोहन कुंजीर यांनी महाराष्ट्र चे नेतृत्व करत भारतामध्ये पहिला क्रमाक पटकावून सुवर्ण पदक मिळवले.
या सर्व विद्यार्थीनिंना संपुर्ण मार्गदर्शन समाधान दाने, गणेश घुगे व आकाश कसबे यांनी केले. याच मार्गदर्शनामुळे यश संपादन केले त्यामुळे या मुलांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. त्याचबरोबर शरद पवार सर, डॉ.लोणकर, संदीप टेगले सर केडगाव चौफुला ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.त्याचबरोबर या विद्यार्थींच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले.